..तर कॉंग्रेसने जाहीरनाम्यात कलम 370 करावा-पहा काय आहे सविस्तर प्रकरण

 काँग्रेसने काश्मीरचा विशेष दर्जा पुनस्र्थापित करण्याच्या मागणीचे समर्थन केल्यानंतर शनिवारी भाजपने टीकेचा भडिमार केला. बिहारमध्ये मते मिळवण्यासाठी काँग्रेसचे नेते विभाजनवादी विधाने करत आहेत. हिंमत असेल तर काँग्रेसने बिहारच्या जाहीरनाम्यात अनुच्छेद ३७०चा उल्लेख करावा, असा शाब्दिक हल्ला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.



काश्मीरला अनुच्छेद ३७० नुसार दिलेला विशेषाधिकार पुन्हा मिळावा यासाठी जम्मू-काश्मीरमधील मुख्य राजकीय पक्ष ‘गुपकार ठरावा’द्वारे एकत्र आले आहेत. त्याला पाठिंबा देणारे ट्वीट माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले. काश्मीरचा विशेषाधिकार पुनस्र्थापित करण्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. हा अधिकार केंद्र सरकारने मनमानी पद्धतीने काढून घेतला असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

Read Latest news: Latest Marathi news

Comments